Monday, March 23, 2020

....यामुळे उन्हाळ्यात गॉगल हे वापरावेच लागतात..

.....यामुळे उन्हाळ्यात गॉगल हे वापरावेच लागतात ......

           ''तेरी आखों के सिवा एस दुनिया मै रखा क्या है''..!

                           Image result for sunglass model in summer

  मित्रांनो हे डोळे ज्याने आपण ही सृष्टी पाहू शकतो.आपल्या मनातील सर्व भावना या डोळ्यांमुळे आपल्याला दर्शविता येतात,या डोळ्यांची स्तुति कितेक शेरो-शायरीतून कितेक जणांनी केली आहे.पण आशा प्रिय डोळ्यांची आपण एवढी काळजी घेतो का ? मित्रांनो आता तर उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत.त्यातच या वर्षाचा उन्हाळा हा कितेक मोठ्या प्रमाणात झळा देणारा होत आहे.आणि जर का आपण आपल्या किमती डोळ्यांची अश्या उन्हाळ्यात काळजी घेत नसू तर खूप भयंकर परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतात हे नक्कीच...!             नक्की गॉगल हे उन्हाळ्यात का वापरावेत तसेच ते इतर वेळी देखील का वापरावेत आणि गॉगल वापरुन मिळणारे फायदे काय आहेत हे या ब्लॉग मधून सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे.

              
      -100% ultra violet rays protection :-
       
                       Image result for uv protection sunglasses
                                
             आता या उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणे ही मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येत असतात.आणि या किरणांमधून अल्ट्रा वॉयलेट किरणे ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.जे आपल्या शरीराला तसेच महत्वाचे म्हणजे आपल्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचवू शकतात.ही अल्ट्रा वॉयलेट किरणे जर का आपल्या डोळ्यांवर नियमितपणे contact मध्ये येत राहीले .तर आपल्या डोळ्यांमध्ये  मोतीबिंदू सारखे आजार तयार होतात. तसेच या अल्ट्रा वॉयलेट किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचे ही प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.गॉगल (uv 400 ) वापरल्यामुळे आपले डोळे हे सूर्यप्रकाशामधून येणारे अल्ट्रा वॉयलेट किरणे हे परावर्तीत करून आपल्या डोळ्यांना सुरक्षित करतात.त्यामुळे आपला गॉगल खरेदी करताना तो 100% uv protected असलेलच खरेदी करावा. 


     

         -धूळ -माती पासून संरक्षण मिळवण्यासाठी ;-

                          Image result for wrap around sunglass wear model   
          

            जमीनीवरील पाण्याची आद्रता उन्हाळ्यामध्ये पुर्णपणे कमी झाल्यामुळे जमीनीवरील धूळ तसेच माती हे सतत वार्‍यामुळे हवेमध्ये तरंगत असतात.तसेच वाहने,गाडी वगेरेंमुळे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उडतात.व आपण वाहने चालवत असताना ते आपल्या डोळ्यांमध्ये आचानक जातात ,अनेकवेळी या अश्या धूळ आणि माती डोळ्यात गेल्यामुळे आपल्या गाडी वरचा ताबा सुटून आपघात होण्याचे chances 30 ते 40% पर्यन्त वाढतात .त्यामुळे आपण जर का  उन्हाळ्यामध्ये तसेच इतर ऋतु मध्ये देखील  आपल्या डोळ्यांच्या सुरक्षितेसाठी गॉगल हा वापरुन आपल्या डोळ्यांची त्याचबरोबर आपल्या स्वतची काळजी घेतली पाहिजे..


            -आपल्या चेहर्‍याला नवीन लुक देण्यासाठी ;-
                                    
                                  '' सगळेच हीरो गॉगल घालत नाहीत पण,
                              गॉगल घालणारे सगळे हे हिरोच दिसतात ''  

                 Image result for sunglass wear model
           
                         
                       मित्रांनो जर का आपण पाहिलात आजकालच्या सर्व चित्रपटांमध्ये हीरो,विलन किवा हिरोईन आशे व्यक्तिरेखा करणारे व्यक्ति गॉगल हे वापरतच असतात तर का?
                       तर या व्यक्तिरेखा सकरणारे व्यक्तींना आपला एकंदरीत पेहराव हा एतरांपेक्षा वेगळा दाखवायचा असतो.जेणेकरून त्या चित्रपटांमध्ये ती व्यक्ति आधिक प्रमाणात प्रभावित दिसेल उदा.कबीर सिंह ,आशिकी ,टायगर झिंदा है,दबंग इ. अशा चित्रपणामद्धे याचा वापर केलेला आपणास दिसतो.
                       नेमकं गॉगल वापरल्यामुळे आपल्या चेहर्‍याला एक नवीन लुक तयार होतो,आपले चेहर्‍यावरील हावभाव हे बदलले ही जातात. जर आपण आपले स्वतचे फोटो काढत असू तर एक वेगळा असा फोटो येऊ शकतो.त्याचबरोबर जर आपण पाहिलात तर आपणास दिसून येईल की गॉगल घालणारे लोक हे जास्त intelligent आणि intellectual दिसतात .जर का आपण कॉलेज 
करत असाल तर गॉगल हा नक्कीच वापरला पाहिजे.जेणेकरून इतर लोकांचं तुमच्याकडे आकर्षण वाढेल..


             -डोळ्यांभोवती पडणारे काळे डाग व सरकुत्या पासून बचावासाठी;-
                        Image result for dag circles on eyes          


             गॉगल न वापरता सततच्या प्रवासामुळे सूर्यकिरणे आपल्या डोळ्यांच्या डायरेक्ट contact मध्ये येतात. व यामुळे आपले डोळे हे सतत लहान राहण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग तसेच सुरकुत्या पडत जातात ज्यामुळे आपले वय कमी असून ही म्हणजे आपण तरुण असूनही या डागांमुळे व सुरकुतेमुळे आपल्याकडे बघणार्‍याला आपले वय हे जास्त वाटते.यामुळे नियमितपणे गॉगल वापरल्यामुळे असे डाग व सरकुत्या येण्याचे प्रॉब्लेम कमी होतात.
            

  अक्षय भिसे   

(स्वंस्थापक-आन्नाझ फॅशन,कबनूर,इचलकरंजी)  





6 comments:

  1. Replies
    1. तुम्हाला आमची माहिती आवडली आसे आम्ही गृहीत धरतो.अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्या सोबत शेअर करत राहू🙏🙏🙏

      Delete
  2. Replies
    1. thnx a lot sir.ur inspiration is our real power.

      plz read another new blog
      ......ROLEX चे घड्याळ इतके महाग का असतात ?
      https://annazfashion.blogspot.com/2020/03/rolex.html

      Delete
  3. Replies
    1. thnx for reading this important blog.if u like this plz dont forget to share.
      and plz read this new blog;-

      ......ROLEX चे घड्याळ इतके महाग का असतात ?
      https://annazfashion.blogspot.com/2020/03/rolex.html

      Delete

Tattoo काढताय?? थांबा हे वाचा.

Tattoo  काढताय?? थांबा हे वाचा.         बर्‍याच वर्षांपासून आपल्या शरीराला एक वेगळी ओळख देण्यासाठी आपल्या शरीरात करण्यात...