आपण दिसायला खूप स्मार्ट आहोत, इतर मुलांच्या नजरेत आपण चॉकलेट बॉय आहोत.पण मुली आपल्याकडे लक्ष देत नसतील तर थोडा पर बदल आपण आपल्या व्यवहारात केलाच पाहिजे.आणि जर का हा बदल केला तर मुली स्वतःहून तुम्हाला इंप्रेस केल्याशिवाय राहणार नाहीत तर या काही टिप्स तुमच्यासाठी आहेत.तसे तर प्रत्येक मूला मुलींचे आवड निवड वेगळी असते.पण बऱ्याच मुलींना या खालील प्रमाने गोष्टी मुलांमध्ये पाहायला आवडतात.मुलींना कसे मुले आवडता यावर पूर्ण पणे उत्तर नाही. पण ध्येयवेडा असणारा,स्वतः सोबत इतरांचे काळजी घेणार, प्रतेकाचा सम्मान करणारा,उत्साही आंनदी स्वभावाचा,नेहमी चांगला व फ्रेश दिसणारा, प्रशसा करणारे असे गुण असणारे मुले देखील मुलींना आवडतात.जर का मुली आपल्याकडे लक्ष देत नसतील तर आपण आपल्या वागणूकी मध्ये व व्यवहरात बदल करायाला हवा,तुमच्यासाठी या खालील काही टिप्स ज्यामुळे तुम्हाला मुली स्वतः हुन पसंद करतील.
●ध्येयंवेडा असणे-
मुलींना बहुतांश वेळा एकाद्या असा मुलाकडे इंप्रेस होत असतात जो आपल्या स्वप्नांना घेऊन ध्येयवेडा असतो.आपले ध्येय गाठण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. आपल्या ध्येयाला घेऊन अनेक चांगले गोष्टी करत असतो. आपल्या ध्येया सोबत इतरंचा देखील विचार करत असतो.त्यामुळे मुलानी ही नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपल्या स्वतःच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी तसेच आपल्या भावी कुठुंबासाठी ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ती जर का सवय आता पसुन तुम्ही स्वताला लावून घेतलात तर तुम्हाला मुली स्वतः पसंत करायला लागतील.
●नेहमी उत्साही व आनंदी असणारा-
आपण एकंदरीत पाहिलंत की जे लोक जास्त हसमुख, आनंदी व दुसऱ्यांना हसवणारे असतात त्यांच्याकडे आपण जास्त आकर्षित होत असतो. त्याचप्रमाणे मुलींचे देखील आहे. जे मुले जास्त आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावरील एक चमक आणि उत्साह हा वेगळा असतो. त्याच चमके मूळे त्यांच्या स्वभावाची ओळख बनत असते. जर का आपला चेहरा आनंदी असला तर तो उत्साही आणि जोशपूर्ण दिसत असतो. त्याच सोबत लोकांना आनंदी उत्साही राहणे माहित आहे पण स्वतःसोबत दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतो, असे मुले मुलीना विशेष आकर्षित करतात.
● काळजी घेणारा-
मुलींना नेहमी काळजी घेणारी मुले जास्त आवडतात. कारण त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये जरी कोणी त्यांच्यासोबत नसेल तरी काळजी घेणारा तो त्यांचा Boyfriend त्याचा जवळ असतो. त्यांना वाटते की हा मुलगा आपली काळजी घेऊ शकतो.त्याचबरोबर इतरांना खुश ठेवणारा आणि हसवणारा मुलगा जास्त आकर्षित करत असतो त्यामुळे नेहमी इतरांना जास्त खुश ठेवण्याचे आणि हसवण्याचा प्रयत्न करावे.
● तटस्थ मुले-
मुली या अशा मुलांकडे आकर्षित होतात जे मुले त्यांना भाव देत नाहीत, अशी मुले जे मुलींच्या बाबतीत तटस्थ असतात. ज्यांना मुलींमध्ये खास रुचि नसते. जर मुलींकडे पाहून लगेच वळण्याची प्रवृत्ती असेल तर स्वतःला व स्वतःच्या भावनांना नियंत्रित करा. एकदमच मुलीसारखा व्यवहार करू नका. त्यांना लगेच वाटेल की, तुम्ही तिला पसंत करता. आपल्यातील विश्वास काहीही करू शकतो, हाच विचार मुलींचाही असतो. केवळ स्वतः वर विश्वास ठेवणारी मुले मुलींच्या हृदयात स्थान
निर्माण करतात.
● मुलींचा आदर करणारा-
मुलींना महिलांचा आदर करणारे मुले खूप आवडतात. कारण यांच्याकडून मिळालेल्या
आदरावरून मुलींच्या मनात महिला विषयांच्या सन्मानाचे विचार समजतात.मुलींना भावनिक मुले ही खूप आवडतात कारण मुलगा जर भावनिक असेल तर तो आपल्याला जास्त समजावून घेइल असा विचार असतो.
●नेहमी चांगला आणि फ्रेश दिसणारा-
मित्रांनो आपण जर का पाहिलात तर मुलींच्या मते त्यांना सलमान खान, विराट कोहली,शाहरुख खान असे अनेक सेलिब्रिटी पसंद असतात ते मुलींना अधिक आकर्षित करत असतात. कारण ते जे लोक आहेत त्यांच्या एकंदरीत जो फ्रेशनेस असतो तो मुलींना जास्त आकर्षित करतो.
त्याचप्रमाणे नेहमी आपले कपडे, केस,आपले शूज, फॅशन accessories इ. वापरुन नेहमी आपला लुक फ्रेश दिसण्याकडे जास्त प्रयत्न करावा.
● आत्मविश्वासू मुले-
मुलींना मुलांमधील आत्मविश्वासू स्वभाव खूप आवडतो. संकुचित स्वभावाची मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मुलानी जिथे पर्याय मिळेल तिथे आपला धाडसीपणा दाखवावा, आपला आत्म-विश्वास दाखवावा .एखाद्या व्यक्तीसोबत/मुली सोबत बोलायचे असेल तर निडरपणे बोलावे. आपले मत त्यांच्यासमोर मांडावे. आत्मविश्वासामुळे काही मुलाना राग येत असतो राग हा आलाच पाहिजे पण राग हा अति प्रमाणात येणे धोक्याचे असते. त्यामुळे त्याला नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
आत्मविश्वासाने मुलींसोबत गप्पा मारण्यात, तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावी म्हणजे दोघांमधील संबंध अधिक व्रढ ठेवण्यास मदत होते.
मित्रांनो आपल्या स्वतःमध्ये अनेक गुण असतात जे आपल्यामध्ये दडलेले असतात. अशा दडलेली गुणांना एक नवीन उभारी देऊन.आपल्या स्वभाव जास्तीत जास्त लोकांना आवडेल याकडे लक्ष द्यावे . जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. प्रतेक वेळी असाच सपोर्ट आणि तुमचे प्रेम देत आसल्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. आमचे प्रतेक ब्लॉगचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
अक्षय भिसे
(फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी )
No comments:
Post a Comment