पाहून थक्क व्हाल..तयार रहा.नवीन फॅशन येत आहे भारतात.
या फॅशन च्या जगामध्ये दररोज नव-नवीन काही ना काही तयार होत असते. जगातल्या प्रतेक देशा मध्ये त्यांच्या त्यांच्या संस्कृती नुसार जी ती फॅशन तयार होत राहते.प्रतेक ऋतु नुसार फॅशन डिजायनर वेगवेगळे कपडे तयार करत असतात.त्याच प्रमाणे आपल्या भारतापेक्षा इतर देशांमध्ये विविध आणि वेगळे आसे फॅशन बाजारात येत असतात.आशीच एक फॅशन बाजारात आली आहे जी आजपर्यंत फक्त महिला आणि मुली वापरत होत्या.तीच फॅशन continue करून मुले आणि पुरुषासाठी बाजारात उपलब्ध झाली आहे.
या फॅशन चे नाव आहे क्रॉप टॉप.ही फॅशन डिजायनर च्या मते त्यांनी खास या उन्हाळ्यासाठी तयार केली आहे जेणे करून पुरूषांना या उन्हाचा त्रास होऊ नये. यासाठी त्यांनी या कपाडांमद्धे 80 टक्के कॉटन चा वापर केला आहे,जेणेकरून हे कापड वापरल्यावर शरीरावर ते जास्त प्रमाणात कम्फर्ट देईल.उन्हामध्ये जो घाम येतो तो शोषून घेतला जाईल.त्याचप्रमाने जो फॅशन चा लुक आहे तो आधिक वाढवला जाईल.
या मेन्स ड्रेसिंग स्टाइल चे फॅशन शो मध्ये प्रकाशन देखील झाले आहे.आणि बर्याच लोकांना ही नवीन फॅशन ही मोठ्या प्रमाणात आवडली आहे. आता विदेशामध्ये या ड्रेसिंग स्टाइल ची क्रेझ तयार होत आहे.त्याचप्रमाणे याचे फोटो शेअर देखील होत आहेत.
ही फॅशन अजून भारतामध्ये आलेली नाही,परंतु ही स्टाइल लवकरच ऑनलाइन वेबसाइट वर प्रकाशित होणार आहेत.अजून भारतामध्ये ही फॅशन ऑनलाइन साइट असलेल्या flipkart,amazon etc. यावर प्रकाशित झालेल्या नाहीत पण ही स्टाइल ASOS.com या साइट वर MENS CROP TOPS नावावर उपलब्ध आहे.जर कोणला हे ड्रेस पसंत असतील तर त्यांनी या साइट वर जाऊन खरेदी करू शकता.
या फॅशन विषयी tweeter वर देखील खूप चर्चा आहेत.बरेच लोक या स्टाइल साठी आकर्षित असल्याचे दिसून येत आहे.तर या फॅशन ल घेऊन काही लोक शॉक असल्याचे tweeter मधून दिसत आहे.बर्याच लोकांनी ही स्टाइल खरेदी केल्याचे दिसून येते.
ASOS.COM या साइट वर याला खरेदी करण्यासाठी याची किमत ही आठ डोलर पासून पुढे आहे.ही फॅशन भारतामध्ये लवकरच येणार आशी आशा आहे.
मित्रांनो जर का असे नवीन नवीन फॅशन संबंधित माहिती हवी असेल तर नक्की subscribe करा. ही फॅशन जर का आवडली असेल तर कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.जर का कोणती नवीन माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कळवा.असाच नेहमीप्रमाणे सपोर्ट आणि प्रेम मिळत असल्यामुले खूप खूप धन्यवाद....
अक्षय भिसे
(फौंडर ऑफ आण्णाझ फॅशन कबनूर ,इचलकरंजी)
No comments:
Post a Comment